???? भव्य “अजित कृषी महोत्सव २०२६” वर्ष १ले – कार्यक्रम पत्रिकेचे दिमाखात अनावरण ????

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा 

श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) : पै. दत्तात्रय उर्फ आबासो काळे सामाजिक प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र थेऊर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य “अजित कृषी महोत्सव २०२६” (वर्ष १ले) या महत्त्वाकांक्षी कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे दिमाखात अनावरण महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (वहिनी साहेब) यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी युवा नेतृत्व जयदादा अजित पवार उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना महोत्सवाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आले असून कार्यक्रमास पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांचीही उपस्थिती लाभली. या अनावरण सोहळ्यामुळे संपूर्ण हवेली तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

???? दिनांक व स्थळ

दिनांक : ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६

स्थळ : श्रीक्षेत्र थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे

पाच दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवात राज्यासह देशभरातील शेतकरी, कृषी तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

???? २०० स्टॉल्ससह आधुनिक शेतीचे भव्य प्रदर्शन

प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व प्रतिष्ठानचे प्रमुख पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी माहिती देताना सांगितले की, महोत्सवासाठी सुमारे २०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

या प्रदर्शनामध्ये शेती क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

प्रदर्शनातील प्रमुख विषय :

???? आंतरराष्ट्रीय पीक पद्धती व आधुनिक शेती तंत्रज्ञान

???? अत्याधुनिक शेती अवजारे व यंत्रसामग्री

???? उच्च प्रतीचे बियाणे, कीटकनाशके व जैविक उत्पादने

???? हरितगृहे व कृषी जैविक तंत्रज्ञान

???? हॉर्टिकल्चर व फळप्रक्रिया उद्योग

???? डेअरी तंत्रज्ञान व दुग्धविकास

???? शेळी-मेंढी पालन मार्गदर्शन

???? मासेमारी व अक्वाकल्चर तंत्रज्ञान

⚡ अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प

???? शेतमाल प्रक्रिया उद्योग व वेअरहाउस

???? अर्थसाह्य संस्था, कृषी बाजार व विपणन तंत्रज्ञान

???? सेंद्रिय शेती, समूह शेती व शेतकरी बचत गट

यासोबतच ‘पशुपक्षी प्रदर्शन’ हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून विविध प्रजातींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.

???? आदर्श शेतकरी पुरस्कार

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी आणि कृषिकन्यांना “आदर्श शेतकरी पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नवउद्योजक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागणार आहे.

???? आयोजन व समन्वय

या भव्य महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याणकर इव्हेंट मॅनेजमेंटचे श्री. प्रशांत कल्याणकर, सौ. सीमा प्रशांत कल्याणकर तसेच प्रतिष्ठानचे समन्वयक श्री. बापू सोनवणे विशेष प्रयत्न करीत आहेत. स्थानिक स्वयंसेवक, शेतकरी संघटना आणि विविध संस्थांचे सहकार्यही मोठ्या प्रमाणावर लाभत आहे.

???? अधिक माहितीसाठी संपर्क

मो. : ९८५०००१७५५

???? शेती, शेतकरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा “अजित कृषी महोत्सव २०२६” हा थेऊरच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, हवेली तालुक्यासाठी कृषी विकासाचा नवा अध्याय लिहिणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags